सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (21:12 IST)

अधिकार्‍यांच्या डोळ्यात मिरचीपुड फेकून अजमेरला पळाला, नगरमध्ये येताच पोलिसांनी पकडला

मंडलअधिकार्‍यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून त्यांना शिवीगाळ, दमदाटी करणार्‍या आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. 
हसिनभाई चाँद पठाण (रा. अमिरमळा, बुर्‍हाणनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अवैधरित्या खडी वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेले मंडल अधिकारी जीवन सुतार यांच्या डोळ्यात आरोपी हसिनभाई व त्याचा मुलगा हनीफ पठाण यांनी लाल मिरची पुड टाकून शिवीगाळ, दमदाटी केली होती.
नगर तालुक्यातील कापुरवाडी ते वारूळवाडी रोडवरील बुर्‍हाणनगर हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पर्यावरण संरक्षण अधिनियम आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटना घडल्यानंतर आरोपी हसिनभाई अजमेरला पळून गेला होता. तो त्याच्या राहत्याघरी अमिरमळा येथे आल्याची खबर पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ यांना मिळाली होती.
पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिरसाठ यांच्या पथकाने आरोपी हसिनभाईच्या मुसक्या आवळल्या.