सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (15:52 IST)

सरकार म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोरांची टीम किरीट सोमय्या

शरद पवारांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने हडप केले,’ असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले.‘तर, उद्धव ठाकरे यांचं सरकार म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोरांची टीम आहे,’ असा घणाघात त्यांनी केला.महाविकास आघाडी सरकारमधील नेते व मंत्र्यांच्या विरोधात नेहमी नवनवीन आरोप करणारे किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी व शिवसेनेला लक्ष्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले. सोमय्या यांनी  शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महाआघाडी सरकारला लक्ष्य केलं. ‘महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त व्हावा, अशी प्रार्थना साई चरणी केल्याचं त्यांनी सांगितलं. साईबाबांचा आशीर्वाद घेतल्यामुळं माझ्या कामाला आणखी गती मिळेल, असंही ते म्हणाले.
‘राज्यत्री प्राजक्त तनपुरे यांनी राम गणेश गडकरी साखर कारखाना शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली बेनामी पद्धतीने घेतला. कारखान्याची जमीन अनिल देशमुखांना हस्तांतरित केली, हे काय गौडबंगाल आहे, याची चौकशी सुरू आहे,’ असं सोमय्या म्हणाले. ‘
माझ्या घरी ईडीची धाड पडणार आहे. केंद्रीय यंत्रणांनी माझ्याविरोधात कारवाई करावी, म्हणून देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत आहेत,’ असं ट्वीट नवाब मलिक यांनी आज केलं आहे. त्यावर सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली. ‘मालाचा हिशोब
घेण्यासाठी कोणी घरी येईल का, याची भीती त्यांना वाटत असेल. पण ज्यांनी चोरी केली त्यांच्यावर कारवाई होणारच, असं सोमय्या म्हणाले.उद्धव ठाकरे यांचं मंत्रिमंडळ म्हणजे आलिबाबा चाळीस चोरांची टीम आहे. एक जण शंभर कोटीच्या
वसुलीमध्ये तुरुंगात आहे. दुसरा कार्यकर्त्यांचे अपहरण करतो, म्हणून जामिनावर आहे. आनंदराव अडसूळ यांच्यावर ९८० कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी वारंट निघालं असून साडेतीन महिन्यांपासून ते हॉस्पिटलमध्ये बसून आहेत. परिवहन मंत्री
अनिल परब हे बेकायदेशीर रिसॉर्ट बांधण्यात व्यस्त आहेत. केवळ मुख्यमंत्रीच घरी बसले आहेत, असं नाही तर या सरकारचे सगळेच मंत्री कोमामध्ये आहेत. सगळे मंत्री पैसे मोजण्यात व्यस्त आहेत. न्यायालयाच्या आशीर्वादानं धाडी सुरू आहेत, पैसे जप्त करण्याचं काम सुरू आहे,’ असं सोमय्या म्हणाले.