बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (12:44 IST)

बुलेट ट्रेन करणार शिवसेना रद्द, त्यातील पैसे देणार शेतकरी वर्गाला

महाराष्ट्र राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीमधून हो मिळाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेगात घात आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीचे सत्र सुरु असून किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरु आहे असे समजते आहे. याच चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला देण्यात येणारा निधी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी वापरण्यावर चर्चा झाल्याचे समोर येत असून सर्वानी त्यावर सहमती दर्शवली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आल्यास शिवसेना  बुलेट ट्रेनला देण्यात येणारा निधी शेतकऱ्यांसाठी वापरला जाणार आहे.
 
मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये राज्य सरकार २५ टक्के निधी द्यावा लागणार आहे. हा निधी बुलेट ट्रेन प्रकल्पाला न देता तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरण्यात यावा असा सूर या पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये घेतला गेला आहे. आघाडीच्या बैठकीमध्ये या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. तिन्ही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमातील सर्वात महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांची कर्जमाफीचा आहे.  बुलेट ट्रेन प्रकल्पात २५ टक्के हिश्श्यामुळे राज्याला पाच-साडेपाच हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.