गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (15:50 IST)

ठाण्यात आवाज शिवसेनेचा महापौर पदी म्हस्के तर उपमहापौरपदी कदम

Shiv Sena mayor's position in Thane and step in as Deputy Mayor
महापौर आणि उपमहापौर पदासाठी बिनविरोध म्हणून नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांची सेनेकडून निवड झाली आहे. ठाणे महापालिका महापौर पदासाठी सभागृह नेते नरेश म्हस्के आणि ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांचे नावं आघाडीवर होते. त्यापैकी नरेश म्हस्के यांची अखेर महापौर पदावर वर्णी लागली आहे. दुपारी ०१.०० नंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे ठाणे महापालिकेत दाखल झाले आहे. तसेच इतर सेना नेतेदेखील उपस्थित आहेत.
 
राज्यात बदलेलं सत्तासमीकरण पाहता ठाण्यात महाआघाडीचा महापौर होईल अशी शक्यता वर्तविली जात होती… शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची विनंती मान्य करत ठाणे मनपामध्ये शिवसेनेविरुद्ध कोणत्याच पक्षाने महापौर व उपमहापौर पदाकरता अर्ज भरलेला नव्हता. त्यामुळेच ठाण्यात खऱ्या अर्थाने महाशिवआघाडीचे दर्शन घडले.
 
ठाणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी शनिवारी ( नोव्हेंबर) अर्ज दखल करण्यात आले होते. महापौर पदासाठी ठाणे महापालिकेचे सभागृह नेते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के यांनी अर्ज दाखल केला होता. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी कदम  यांनी अर्ज दाखल केला होता.
 
महापौर आणि उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवकही अर्ज दाखल करणार होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत माघार घेतली. त्यामुळे नरेश म्हस्के यांची महापौरपदी तर पल्लवी कदम यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली.