गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (15:52 IST)

आम्हाला अडीज वर्षे मुख्यमंत्रीपद द्या - राष्ट्रवादीची मागणी

राज्यात सरकार स्थापन होईल की नाही होणार हा प्रश्नच आहे. रोज नवीन विधाने आणि नवीन मागण्या केल्या जात आहेत. आता पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, असं खासदार संजय राऊत सर्वत्र सांगत आहेत. हे होते आता तर राष्ट्रवादीकडूनही अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा आग्रह करतांना समोर येते आहे. मात्र अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची चर्चा अद्याप झालेली नाही, परंतु अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाही मिळावं, अशी मागणी असल्याचं राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केल्याचे सांगितले आहे.
 
राष्ट्रवादीला शिवसेनापेक्षा फक्त दोनच जागा कमी जिंकल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाही मिळावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे, सुनिल तटकरे यांनी सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. सत्तास्थापनेचा दावा करण्याची तारीख अद्याप निश्चित नसल्याचं तटकरेंनी सांगितले आहे.
 
राष्ट्रवादी आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद पाच वर्ष पूर्णवेळ मिळेल. उपमुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची नावे पुढे आली आहेत. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची दाट शक्यता आहे.