रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (11:02 IST)

काँग्रेस आज करणार विधिमंडळ नेत्याची निवड

राज्यात सरकार स्थापनेसाठीची प्रक्रिया काहीशी लांबली असली तरी आता ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यानंतर आता आघाडीचे नावही निश्चित झाले आहे. या पार्श्वभूीवर काँग्रेसकडून आज (शुक्रवारी) विधानभवनात काँग्रेसची बैठक पार पडणार असून या बैठकीत विधिंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे.
 
काँग्रेसकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या विधिमंडळ नेत्यांची निवड केली होती. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भाजपकडून, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेकडून तर अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून निवड करण्यात आली होती.