1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (08:32 IST)

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा 'अशा' होणार आहेत

shivaji university
शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन 15 सप्टेंबरपासून, तर लेखी परीक्षा 1 ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात झाला. परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
 
अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. अंतिम वर्षांच्या शेवटच्या सत्राच्या 220 हून अधिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातून 75 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
 
50 गुणांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची प्रश्नपत्रिका असेल. प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम अधिष्ठाता मंडळ, त्या-त्या विषयांचे प्राध्यापक आणि परीक्षा विभाग मिळून करणार आहेत. बॅकलॉगच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी त्या-त्या महाविद्यालयांवर सोपविण्याचा निर्णय झाला आहे. केवळ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यापीठ महाविद्यालयांना पुरवणार आहे. उपलब्ध शाळा, महाविद्यालयांत ऑफलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले.