Weather Report : आज कोकणाला ऑरेंज अलर्ट

mumbai rain
Last Modified शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (09:47 IST)
मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात शुक्रवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला होता. कोकणातही पाऊस पडत असून शनिवारीदेखील संपूर्ण कोकणात (आॅरेंज अलर्ट) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.सकाळपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाने मुंबईत दुपारनंतर वेग पकडला. पाऊस कोसळत असतानाच ४ ठिकाणी घरांचा भाग पडला, ४ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या, तर १२ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.
शुक्रवारी सकाळपासून सुरू असणारा पाऊस मुंबईत रात्री उशिरापर्यंत कायम राहिला. शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबई शहरात ५४.७८ मिलिमीटर तर पूर्व उपनगरात ४३.५६ व पश्चिम उपनगरात २६.२२ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांनाही दिवसभर पावसाने झोडपून काढले.

मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचे आवाहन
गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ येथे २९ ऑगस्ट रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर ३० आॅगस्ट रोजी गोव्यासह कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. अरबी समुद्रात ताशी ५५ किमी. वेगाने वारे वाहतील. मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
गणेशभक्तांची उडाली तारांबळ
शुक्रवारी सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होत असतानाच पाऊस दाखल झाल्याने गणेशभक्तांची तारांबळ उडाली. दुसरीकडे मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, पावसामुळे मुंबईतील वाहतुकीचा वेग कमी झाला होता. शिवाय दिवसभर पाऊस पडत असलेल्या मुंबईतील रस्त्यांवर वर्दळदेखील कमी होती.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

निलेश राणे आणि रोहित पवार यांच्यात ट्विटर युद्ध

निलेश राणे आणि रोहित पवार यांच्यात ट्विटर युद्ध
भाजपा नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली ...

खडसे यांना दिलासा, तोपर्यंत ईडी अटक करण्याची कारवाई करणार ...

खडसे यांना दिलासा,  तोपर्यंत ईडी अटक करण्याची कारवाई करणार नाही
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द ...

'हे' आंदोलन म्हणजे केवळ एक पब्लिसिटी स्टंट : रामदास आठवले

'हे' आंदोलन म्हणजे केवळ एक पब्लिसिटी स्टंट  : रामदास आठवले
किसान सभेने मुंबईत केलेलं हे आंदोलन म्हणजे केवळ एक पब्लिसिटी संस्ट असल्याचा आरोप केंद्रीय ...

राजभवनाकडून खुलासा प्रसिद्ध, राज्यपाल अनुपस्थितीची दिली ...

राजभवनाकडून खुलासा प्रसिद्ध, राज्यपाल अनुपस्थितीची दिली होती पूर्वकल्पना
मुंबईत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून देण्यात येणारे निवेदन स्वीकारण्यासाठी राज्यपाल भगतसिंह ...

राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करा : मनसे

राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करा : मनसे
वाढीव वीज बिलाबाबत यूटर्न घेणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकारच्या विरोधात ...