शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (08:43 IST)

नारायण राणेंना कामधंदा उरलेला नाही : गुलाबराव पाटील

“नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत” अशा शब्दात शिवसेनेचे  नेते गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधलेला आहे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी ‘नाणार’ प्रकल्पाबाबत शिवसेनेवर केलेल्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जळगावातून जोरदार प्रत्युत्तर दिलेले आहे. “नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाहीये. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात.
 
शेवटी त्यांना अशी विधाने करुन स्वतःचा टीआरपी म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते.” असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केलेला आहे. “नारायण राणे स्वतः मुख्यमंत्री असताना कोकणात कोणताही नवीन प्रकल्प आणू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींविषयी तर काही बोलूच नये. ते जर असे काही बोलले नाहीत, तर त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही” असा चिमटा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी राणेंना काढला आहे.