1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. shivsena-mp-sanjay-jadhav-file-police-complaint-over-murder-plan

शिवसेना खासदारसंजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी सुपारी, पोलीसात तक्रार दाखल

परभणीमधील शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे. संजय जाधव यांनी याबाबत नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात त्यांनी दोन कोटींची सुपारी देण्यात आली असल्याचा दावा केला आहे.
 
आपली हत्या करण्यासाठी नांदेडमधील रिदा गँगला दोन कोटींची सुपारी देण्यात आली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. परभरणीमधील एका मोठ्या व्यक्तीकडून ही सुपारी देण्यात आली असल्याचं संजय जाधव यांचं म्हणणं आहे. संजय जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांकडून चौकशी समिती नेमण्यात आली असून संपूर्ण माहिती घेतल्यानंरच गुन्हा दाखल केला जाणार आहे.
पुढील लेख
'या' अॅपवरून दिवाळीत 1 रुपयांत खरेदी करता येणार सोनं