सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (08:38 IST)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरावर, कार्यालयावर मोर्चे काढा

Rahul Shevale
शिंदेंच्या मेळाव्यामधून लोकसभेमधील शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आपल्या भाषणामध्ये शेवाळे यांनी वडील चोरले या आरोपाला उत्तर दिलं आहे. या भाषणामध्ये शेवाळेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली त्यावेळेस ‘मातोश्री’वरुन आलेल्या आदेशांबद्दल खळबळजनक दावा केला आहे.
 
आदित्य ठाकरेंनी केलेल्या खोके घेतल्याच्या आरोपांवरुन उत्तर देताना शेवाळे यांनी, “याच युवराजांना आम्ही सांगू इच्छितो की, छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले तेव्हा आम्ही सर्वजण शिवसेनेच्या पाठिशी उभे राहिलो. त्यावेळी युवराजांनी आपल्या वडिलांना विचारायला हवं होतं की किती खोके आम्हाला त्यावेळी दिले,” असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना शेवाळे यांनी राज यांनी शिवसेना सोडली तेव्हा आम्हाला मातोश्रीवरुन राज यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा आणि त्यांना शिव्या घालण्याचे आदेश देण्यात आल्याचा उल्लेख केला.
 
“२००५ मध्ये राज ठाकरे शिवसेना सोडून गेले तेव्हाही आम्ही आम्ही शिवसेनेला साथ दिली. शिवसेनाप्रमुखांना साध दिली. तेव्हा किती खोकी दिली याचाही आम्हाला हिशोब मिळायला पाहिजे. तेव्हा तर आम्हाला असे आदेश होते की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरावर मोर्चा काढा. कार्यालयावर मोर्चे काढा, त्यांना शिव्या घाला, त्यांच्यावर आरोप करा, असे आरोप आम्हाला ‘मातोश्री’वरून वारंवार येत होते,” असं शेवाळे म्हणाले.

Edited by: Ratnadeep Ranshoor