1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (08:50 IST)

कोजागिरी, मंगळागौर, अगदी लग्नालाही खेळाचा दर्जा दिला पाहिजे राज ठाकरें यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला

raj thackeray shinde
अनेक शहरांमध्ये यापूर्वी दहीहंडी हा सण-उत्सव म्हणून साजरा केला जायचा. परंतु, आता या खेळाला अभिनेते-अभिनेत्री हजेरी लावू लागले, तसेच मोठमोठ्या बक्षीसांच्या रकमा द्यायला लागल्यामुळे दहीहंडीला ग्लॅमर मिळालं. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली. त्यावरुन आता शिंदेंना जोरदार टीकेला सामोरं जावं लागत आहे.
 
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. शस्त्रक्रियेमुळे राज ठाकरेंनी काही दिवस विश्रांती घेतली होती. या मोठ्या विश्रांतीनंतर त्यांनी पहिलंच भाषण केलं आहे. या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या दहीहंडीबद्दलच्या निर्णयावर टोला दिला आहे. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. त्याचप्रमाणे आता कोजागिरी, मंगळागौर, अगदी लग्नालाही खेळाचा दर्जा दिला पाहिजे, अशी खोचक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. भाजपाने शिंदे गटासोबत सरकार स्थापन केल्यानंतर मनसेने भाजपाला पाठिंबा दर्शवला होता.