'शिवशाही'ची वातानुकूलित शयनयान सेवा बंद
एसटी महामंडळाच्या महत्त्वाच्या सेवा प्रकल्पातील शिवशाही वातानुकूलित शयनयान सेवा बंद झाली आहे. भाडेतत्त्वावरील असलेल्या या सेवेतून काही कंपन्यांनी घेतलेली माघार, प्रवाशांचाही अल्प प्रतिसादासह अन्य कारणे बंद होण्यास कारणीभूत ठरली.
ऑगस्ट २०१८ मध्ये भाडेतत्त्वावरील शिवशाही शयनयान वातानुकूलित बस सेवेत आली आणि पहिली बस शिरपूर (धुळे) ते पुणे मार्गावर धावली. त्यानंतर या सेवेचा विस्तार के ला गेला. एसटीने या बस गाडय़ांसाठी मुंबई ते कोल्हापूर, जळगाव, परळी, अक्कलकोट, आंबेजोगाई, पुणे ते नांदेड, लातूर ते कोल्हापूर, औरंगाबाद ते मुंबई सेंट्रल यासह अन्य मार्ग निवडले. मात्र एक हजार रुपयांपेक्षा जास्त भाडे त्यातुलनेत खासगी सेवांचे कमी दर यातून एसटीच्या सेवेला कमी प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे फे ब्रुवारी २०१९ मध्ये शिवशाही वातानुकू लित शयनयानचे विविध मार्गावरील प्रवास भाडे २३० ते ५०५ रुपयांनी कमी के ले. तरीही या सेवेचे सरासरी प्रवासी भारमान ३५ ते ४० टक्के पर्यंतच राहिले.