बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (12:49 IST)

धक्कादायक !सिगारेटच्या कारणावरून मित्राचा खून

मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना सांगली येथे घडली आहे.काही मित्र पार्टी करत होते.त्यांनी आपल्या एका मित्राला सिगारेट आणायला पाठवले आणि त्या मित्राला यायला उशीर झाल्यामुळे रागाच्या भरात येऊन खून केल्याची धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील भोसे गावात घडली आहे.
 
दत्तात्रय झांबरे असे या मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.त्याच्या खुनाच्या आरोपाखाली अमोल खामकर आणि सागर सावंत अशा या तरुणांना मिरज पोलिसांनी अटक केले आहे.
 
अमोल,सागर आणि दत्तात्रय हे तिघे मित्र असून तिघे एकत्र राहायचे.त्या तिघांनी पार्टी करण्याचे ठरवले असताना अमोल आणि सागर ने दत्तात्रय ला सिगारेट आणायला पाठविले.बराच वेळ झाला तो आला नाही.सिगारेट लवकर मिळाली नाही.सिगारेट आणायला उशीर झाला या रागाचा भरात येऊन अमोल आणि सागरने दत्तात्रयाच्या डोक्यात दगड घालून आणि कोयत्याने वार करून खून केला.नंतर त्याचे मृतदेहाचे तुकडे करून कूपनलिकेत टाकून दिले.ही घटना 27 जुलै रोजी घडली.
 
दत्तात्रयच्या कुटुंबीयांनी दत्तात्रय बेपत्ता झाल्याची तक्रार 28 जुलै नंतर पोलिसात दिली होती.शोध घेताना पोलिसांना दत्तात्रयचा खून झाल्याची माहिती मिळाली आणि त्याच्या खून त्याच्या जवळच्या मित्रांनीच केल्याचे आढळून आले.पोलिसांनी अमोल आणि सागर या दोघांना अटक केली आहे.त्यांनी दारूच्या नशेत असताना रागाच्या भरात  येऊन खून केल्याचे समजले .