1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (10:56 IST)

इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी नवीन नियमावली

New rules for those coming to Maharashtra from other states Maharashtra News Coronavirus News In Marathi Webdunia Marathi
दीर्घ काळापासून कोरोना संकटाचा सामना करत असलेल्या महाराष्ट्र सरकारने तिसऱ्या लाटेच्या धोक्यात कडकपणा वाढवला आहे. यामुळे इतर राज्यांतून येणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस किंवा नकारात्मक अहवाल असणं .इतर राज्यातून येणाऱ्यांसाठी अनिवार्य.
 
दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कहर सहन करणाऱ्या महाराष्ट्राने तिसऱ्या लाटेपूर्वी कठोर पावले उचलली आहेत. आता इतर राज्यातून येथे येणाऱ्यांना कोरोना लसीच्या दोन्ही लसी घेणे आवश्यक करण्यात आले आहे. जर त्यांनी लसीकरण केले नाही, तर त्यांना नकारात्मक RTPCR अहवाल दाखवावा लागेल.जर असे नसेल तर त्याला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन मध्ये ठेवणे आवश्यक आहे. 
 
इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांना आता कोरोना लस घेतल्याच्या पुरावा म्हणून लस प्रमाणपत्र जवळ बाळगावे लागणार. महाराष्ट्र सरकारच्या नवीन आदेशात असे म्हटले आहे की बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना दोन्ही लसी घेणे आवश्यक आहे, दुसरी लस घेणे 14 दिवसांसाठी बंधनकारक असेल.जर एखादा प्रवासी या नियमांचे पालन करत नसेल तर त्याला कोरोनाचा नकारात्मक आरटी पीसीआर अहवाल दाखवावा लागेल. तो अहवाल देखील 72 तास जुना असावा. 
 
राज्य सरकारने हे स्पष्ट केले आहे की ,जर एखाद्या कडे कोरोना लस घेतल्याचा पुरावा नाही,आरटीपीसीआरचे अहवाल देखील नाही.तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार.असं करणं बंधन कारक आहे. 
 
महाराष्ट्र सरकार यावेळी इतकी कठोरता दाखवत आहे कारण राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे. दुसऱ्या लाटेत राज्याने कोरोनाचे भीषण रूप पाहिले आहे.आणि तिसऱ्या लाटेत साथीच्या रोगाला सामोरी जावे लागू नये म्हणून उद्धव ठाकरे सरकार आधीच सतर्क झाले आहे.