गुरूवार, 9 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (10:20 IST)

धक्कादायक ! एकाच घरातील चौघांची हत्या

Shocking! Murder of four in the same house Maharashtra News Regional Marathi News Webdunia Marathi
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.इथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असलेले रेवचंद डोंगरु बिसेन (51),मालता रेवचंद बिसेन,(45),पौर्णिमा रेवचंद बिसेन(20),आणि तेजस रेवचंद बिसेन(17) असे मयत झालेल्यांची नावे आहेत. रेवचंद यांची आई सुदैवाने वाचली.त्यांना पक्षाघात असल्यामुळे त्या अंथरुणावरच खिळून आहे. 
 
 रेवचंद हे रेशन धान्य ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून  त्यांच्या कडे 3 मेटाडोर व 1 ट्रॅक्टर आहे.यांच्या कडे कामाला असलेला वाहनचालक यांच्या घरी वाहनाची चावी घेण्यासाठी आला तेव्हा त्याने मृतदेह पाहिल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले.
 
रेवचंद यांच्या घरात अज्ञात रात्रीच्या वेळी मारेकरी शिरले आणि त्यांनी झोपलेल्या कुटुंबावर झोपेतच ट्रॅक्क्टरच्या स्पेंडल ने सपासप वार करून त्यांची हत्या केली आणि ही हत्या नसून आत्महत्या वाटावी यासाठी रेवचन्द यांच्या मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला होता.हा खून व्यवसायातून झाला आहे की कौटुंबिक संपत्तीमुळे झाला आहे अद्याप स्पष्ट झालेले नाही.यात किती मारेकरी होते पोलीस या प्रकरणाचा तपास  करत आहे.