मंगळवार, 16 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (08:27 IST)

चक्क महिलांचे कपडे घालून चोरी करणारा गजाआड

Gajaad who steals wearing women's clothes Maharashtra News Regional Marathi News Webdunia Marathi
औरंगाबादमध्ये एक चोरटा चक्क महिलांचे कपडे घालून चोरी करायचा.पण अखेर याचं बिंग फुटलंचं.आपण चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये दिसू नये,यासाठी हा पठ्ठ्या चक्क गाऊन घालून चोरी करायचा.नईम उर्फ चुन्नू उस्मान शहाअसं या चोरट्याचा नाव. काही दिवस याने पोलिसांना चकवा दिला. 
 
सीसीटीव्हीमध्ये किंवा प्रत्यक्षदर्शींनी कुणी बघितलंच, तर आपली ओळख पटू नये यासाठी तो चक्क बायकांचा गाऊन आणि वर स्वेटर, कानटोपी असा पेहराव करून घरफोड्या करत होता. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी त्यानं ही युक्ती केली.
 
काही काळ पोलिसांची दिशाभूल झालीही. मात्र पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात लंगडत चालायचं नाटक करत असताना चुन्नू सापडला आणि त्याचं बिंग फुटलं. चुन्नूनं गाऊन घालून चोऱ्या करत असल्याची कबुली दिली आहे.