शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (15:44 IST)

शिवरायांचा अवमान करणार्‍या श्रीपाद छिंदमला अटक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केलेले नगरचे माजी उपमहापौर श्रीपाद शंकर छंदम यांना पुन्हा एकदा तोफखाना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
 
मिळेलेल्या माहितीनुसार 9 जुलै 2021 रोजी दुपारी 12.30 दरम्यान नगर जिल्ह्यात दिल्ली गेट भागात ज्युस सेंटर चालकाला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमआणि श्रीकांत छिंदम यांनी दमदाटी करत जातीवाचक शिविगाळ केली होती. त्यानंतर ज्युस सेंटर चालकाने पोलिसात धाव घेतली. प्रकरण कोर्टात पोहचल्यानंतर छिंदमने न्यायालयात अटकपूर्वी जामीनसाठी अर्ज केला. मात्र हा अर्ज न्यायलयाने फेटाळला. नंतर तोफखान पोलिसांनी छिंदमला अटक केली आहे.
 
याप्रकरणी आरोपी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे आणि राजेंद्र म्याना यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.त्यातील दोघांना सशर्त जामीन मिळाला, मात्र श्रीपाद छिंदम आणि श्रीकांत छिंदम यांना जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
 
अहमदनगरचा उपमहापौर असताना श्रीपाद छिंदम याने मनपा अधिकाऱ्याला फोनवरुन शिविगाळ केली होती. या दरम्यान छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारं वक्तव्य केलं. ही ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याचे राज्यभर पडसाद उमटले. त्यानंतर श्रीपाद छिंदम हा फरार झाला. या काळात छिंदमच्या घरावर दगडफेकही झाली होती. 
 
नंतर श्रीपाद छिंदम पुन्हा एकदा मनपा निवडणुकीला उभा राहिला आणि विजयही झाला. मनपा निवडणुकीतील विजयानंतर श्रीपाद छिंदमने पश्चाताप केल्याचं दाखवलं, छत्रपती शिवरायांच्या प्रतीमेसमोर त्याने माफी मागितली. हेच काय तर विधानसभेच्या निवडणुकीत बसपा त्याला तिकीट दिलं आणि त्याने दणदणीत प्रचारही केला. मात्र, मतदारांनी त्याला नाकारल्यानं त्याला पराभवाचा सामना करावा लागला.