शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (08:52 IST)

सिन्नर – सरदवाडी रस्त्यावरील अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम फोडले; २२ लाखाची रक्कम केली लंपास

सरदवाडी रस्त्यावरील अजिंक्य तारा हॉटेलजवळील अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्याने गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील अंदाजे २२ लाख रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना घडली. एटीएमचा काचेचा दरवाजा उघडून चोरटा आत शिरताच त्याने पकडीच्या सहाय्याने सिसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर्स तोडल्या. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने मशीनचा भाग फोडून आतील अंदाजे २२ लाख रुपये चोरटा घेऊन फरार झाल्याचे समजते. चोरट्याने जातांना शटर खाली ओढून घेतलेले असल्याने दिवसभर चोरीचा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. दुपारी ४ वाजेच्या दरम्यान चोरीचा प्रकार उघडकीस येताच जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर अधिक्षक माधुरी केदार-कांगणे, उपअधिक्षक भाऊसाहेब तांबे, निरीक्षक संतोष मुटकूळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.