गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (08:36 IST)

रावणालाही वाटत असेल हा आपल्या तावडीत सापडावा; निलम गोऱ्हेंचा सोमय्यांना टोला

Even Ravana must feel that this should be found in his grasp; Sapphire bulls to Somayya  Maharashtra News Regional Marathi News Webdunia Marathi
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन केलं. त्यावरून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सोमय्यांवर जहरी टीका केली. रावणालाही वाटत असेल हा आपल्या तावडीत सापडावा, अशी खोचक टीका निलम गोऱ्हे यांनी केली.
 
निलम गोऱ्हे आज षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही खोचक टीका केली. किरीट सोमय्या आजच्या दिवशी रावण दहन करत आहेत. रावणाला ही वाटत असावे हा माझ्या तावडीत सापडायला हवा. किरीट सोमय्या हे बेरोजगार आहेत. रोजगार म्हणून रोज काहीतरी ते करत असतात, असा चिमटा निलम गोऱ्हे यांनी काढला.
 
शिवसेना हे आपले दायित्व साजरे करत आहे. तर काही परप्रांतीयांना आणून राजकारण करत आहेत, असं सांगतानाच शिवसेना ही मुंबईची आई आहे. काहीजण दाईची भूमिका घेत आहेत, असा टोला त्यांनी मनसेला लगावला.
 
मुश्रीफांना अटक होणारच
दरम्यान, रावणाचं दहन करण्यापूर्वी किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती हल्ला चढवला. महाराष्ट्राची जनता ठाकरे-पवार माफिया सरकारच्या राक्षसी वृत्तीचं दहन करणार, हे मी वचन देत आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार आणि ४० चोरांचे घोटाळे बाहेर आले असतील. अर्धे कोर्टात धक्के खात असतील, आर्धे ईडी, कुणी सीबीआय तर कुणी इन्कम टॅक्सकडे, तर कुणी मुंबई पोलिसात असेल. कालपासून जेलमध्ये जायची सुरुवात झालीय. आम्ही एक वर्षापूर्वीच मंत्री जितेंद्र आव्हाड जेलमध्ये जाणार असं सांगितलं होतं. अखेर जितेंद्र आव्हाडांना अटक झाली. जितेंद्र आव्हाडांनी आनंद करमुसेंचं अपहरण केलं. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आश्रय दिला होता. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनाही जेलमध्ये जावं लागणार. त्यानंतर खासदार भावना गवळी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना अटक होणार. शिवेसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार, असं सोमय्या यांनी सांगितलं.