सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023 (21:09 IST)

सभागृहात बसलेत की जुगार अड्ड्यावर?,बच्चू कडूंनी ठाकरे गटाच्या आमदारांना झापलं

bachhu kadu
राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षातील ठाकरे गटाचे नेते आणि शरद पवार गटातील नेते सभागृहात गप्पा मारत होते. यावरून बच्चू कडू विधानसभेत संतप्त झाले. सभागृहात बसलेत की जुगार अड्ड्यावर? असा सवाल करत बच्चू कडूंनी ठाकरे गटाच्या आमदारांना झापलं.
 
तुम्ही शिवभोजन थाळीमध्ये भेदभाव कशासाठी करता? शहरातील लोकांना 50 रुपयांचं अनुदान असं बच्चू कडू म्हणाले. परंतु ठाकरे गटातील आमदारांच्या गप्पा सुरूच होत्या. अध्यक्ष महोदय यांना थांबवा जरा… कधीपासून इतकी मोठी चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरे, जाधव, वायकर आणि शिवसेनेचे सर्व नेते आपांपसात चर्चा करत आहेत.
 
हे ज्या गोष्टींची चर्चा करताहेत त्यांचं माझ्यापर्यंत ऐकू येतंय. पण माझं बोलणं त्यांच्यांपर्यंत ऐकू जात नाहीये, असं वाटतं. तुम्ही सभागृहात आहात की सभागृहाच्या बाहेर बसला आहात? अध्यक्ष महोदय तुम्ही त्यांना सांगितल्यानंतर ते बोलतच आहेत. त्यांच्यावर तुमचा प्रभावच पडत नाहीये. तुम्ही सांगा त्यांना असं काही बोलता येत नाही म्हणून… तुम्ही जुगाराच्या अड्ड्यावर बसला आहात का? हे आपसात बोलणं कसं काय शक्य आहे. एकतर तुम्ही-आम्ही तिकडे बसलो होतो. तेथून इकडे आणलं. असं करत-करत इकडे नेण्याचा तुमचा विचार आहे. मी चार वेळेस निवडून आलोय, असं म्हणत बच्चू कडू संतप्त झाले.

Edited By - Ratnadeep Ranshoor