1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जानेवारी 2022 (13:47 IST)

रुग्णालयामागील गॅस चेंबरमध्ये कवट्या आणि अवयव सापडल्या, भयावह दृश्य

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम रुग्णालयात अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टर रेखा कदम यांनी गर्भपात करुन जमिनीत पुरलेले भ्रूण पोलिसांनी जप्त केले आहेत. यावेळी खोदकाम केल्यानंतर आणखी कवट्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 
 
याठिकाणी अल्पवयीन मुलीच्या झालेल्या गर्भपाताच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असताना आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. येथे अल्पवयीन मुलीचा कदम रुग्णालयातील डॉ. रेखा कदम यांनी 30 हजार रुपयांमध्ये गर्भपात केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करून डॉ. रेखा कदम हिला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या आई वडिलांना देखील अटक केली होती. 
 
या प्रकरणात पोलिसांनी तपासणी केली असता समोर आलेले दृश्य भयावह होते. पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस तपासणी केली असता गोबरगॅस चेंबरमध्ये भ्रूण आणि हाडांचे काही अवशेष सापडले आहेत. यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. माहितीनुसार डॉ रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या मागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत नवजात भ्रूणाचे 11 कवट्या आणि 56 इतर अवयव सापडले आहेत. यावरुन हे प्रकरण एकाच घटनेपर्यंत मर्यादित नसल्याचा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान जप्त करण्यात आलेले अवशेष आता डीएनए टेस्टसाठी पाठविण्यात येणार आहे.
 
5 जानेवारी रोजी एका 13 वर्षीय मुलीचा डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयात गर्भपात करण्यात आला होता.