सोमवार, 17 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (13:24 IST)

नाटकातील शंकराच्या गळ्यात नाग!

natak
बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील संकोनटी गावात नाटकात महादेवाची भूमिका करणार्‍या पात्राने गळ्यात जिवंत नाप घालून रंगमंचावर एंट्री घेतल्याने प्रेक्षकांसह सहकलाकारसुद्धा गर्भगळीत झाले.इंचगेरी मठामध्ये जगज्योती बसवेश्वर नाटकाचं आयजन करण्यात आलं होतं. हे नाटक पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी रंगमंचावर संगीताची साथ देणारे कलाकारदेखील उपस्थित होते. पण जेव्हा महादेवाचे पात्र करणार्‍या कलाकाराने एंट्री घेतली, त्यावेळी सगळ्यांना धक्काच बसला. कारण त्या कलाकाराने चक्क गळ्यात जिवंत नाग घातला होता.