1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (08:58 IST)

तर याची किंमत मोजावी लागणार!"संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना सूचक इशारा

In the case of ineligibility of MLAs
आमदार अपात्रे प्रकरणी  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेतली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निकाल राखून ठेवल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. अशात आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुचक इशारा दिला आहे.
 
संजय राऊत राहुल नार्वेकर यांच्याविषयी बोलताना म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांना संविधान, घटना आणि कायदा पाळावा लागेल. आज तुम्ही उल्लंघन केलं आहे. पण भविष्यात सरकार बदलतात. तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे. असं संजय राऊत म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे.
 
ते पुढे म्हणाले की, सगळी यंत्रणा निर्ढावलेली आहे. विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश मानायला तयार नाहीत. त्यांच्याकडे लोकशाही संदर्भात कोणती अपेक्षा ठेवायची? ते एका राजकीय पक्षाचे नेते आहेत आणि विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसले आहेत. हे मान्य आहे. पण शेवटी देशातले संविधान, घटना आणि कायदा तुम्हाला पाळावा लागेल. आज तुम्ही उल्लंघन केलं आहे. मात्र, भविष्यात सरकार बदलतात आणि तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे,
 
Edited By - Ratnadeep ranshoor