1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. /solapur-karmala-farmer-suicide-note

मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, अशी चिठ्ठी लिहून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. धनाजी चंद्रकांत जाधव (वय 45) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. तो   करमाळा तालुक्यातील वीट या गावचे रहिवाशी आहे. धनाजी जाधव हे शेतकरी संपात सहभागी झाले होते. कर्जबारीपणाला कंटाळून त्यांनी जीवनयात्रा संपवली. जाधव यांच्यावर सावकार आणि बँकेचे कर्ज होते. सदरची चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. 

पुढील लेख
अबू आझमींच्या भाच्यावर ड्रग्ज तस्करीचा आरोप