मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 एप्रिल 2022 (15:36 IST)

तर कदाचित त्याच ठिकाणी सोमय्यांची हत्या झाली असती : प्रवीण दरेकर

pravin darekar
किरीट सोमय्या केवळ सीआयएसएफचे जवान होते म्हणून सोमय्यांचा जीव वाचला. नाही तर कदाचित त्याच ठिकाणी सोमय्यांची हत्या झाली असती, असा गंभीर दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  यांनी केला आहे. आम्ही गृहमंत्री, गृहसचिवांकडे गेलो असतो. पण ते न्याय देतील असं वाटलं नाही. सरकार सुडाने पेटलेले आहे. सोमय्या भ्रष्टाचार काढत आहेत. म्हणूनच त्यांना गायब करण्याचा डाव होता. राज्यपालांकडे   आमची शेवटची आशा आहे. म्हणून त्यांच्याकडे न्याय मागायला आलो. आमचा कायद्यावर विश्वास आहे. कायद्याने झालं नाही तर आम्ही संघर्ष करू. या संपूर्ण प्रकरणाचा राज्य सरकारकडून तात्काळ अहवाल मागावा अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.
 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर दरेकर मीडियाशी संवाद साधत होते. राज्यपालांना भेटलो. सरकारच्या माध्यमातून पोलिसांच्या मार्फत दहशतवाद केला जात आहे. या गोष्टी राज्यपालांच्या कानावर घातल्या. सोमय्यांनी सर्व सिक्वेन्स सांगितला. एफआयआर खोटा होता. सोमय्यांनी जे सांगितलं त्या व्यतिरिक्त नोंदवून एफआयआर ऑनलाईन केला गेला. तो रद्द करून नवा एफआयआर घ्यायला हवा. सोमय्यांवर 60 ते 70 जणांच्या जमावांनी हल्ला केला. पण गुन्हा सोमय्यांच्या ड्रायव्हर विरोधात दाखल करण्यात आला. हा प्रकार म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे असाच आहे. नंतर पोलिसांवर दबाव आला म्हणून नावाला महाडेश्वरांवर गुन्हा दाखल केला. काही तरी कारवाई केल्याचं चित्रं निर्माण केलं आणि त्यांना जामीनही दिला, असं दरेकर म्हणाले.