1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. ST Corporation prepares new proposal for 13 50% fare hike

एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री! महामंडळाकडून १३.५०% भाडेवाढीचा प्रस्ताव; आज होणार शिक्कामोर्तब?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC / एसटी) ने १३.५०% भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. आज १५ जुलै २०२६ उन्हाळी हंगामी १०% भाडेवाढ संपुष्टात येत आहे, त्याऐवजी ही स्थायी/नवीन वाढ लागू होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने १३.५०% भाडेवाढीचा नवा प्रस्ताव तयार केला असून आज होणाऱ्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या महत्त्वाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ही भाडेवाढ तातडीने लागू केली जाईल. तसेच सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये होणारे वाद टाळण्यासाठी यावेळी तिकिटांचे दर पाच रुपयांच्या पटीत  ठेवण्यात येणार आहे. तर उन्हाळ्यातील १०% हंगामी भाडेवाढीची मुदत संपल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती, मात्र आता थेट १३.५०% नियमित भाडेवाढीचा बोजा पडणार आहे
एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार, काही कारणांमुळे ही भाडेवाढ अनिवार्य झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये आणि महागाई भत्त्यात वाढ झाल्याने महामंडळावरील आर्थिक बोजा वाढला आहे. तसेच जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे. साहित्याच्या आणि बसच्या सुट्ट्या भागांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे.
राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर प्रशासकीय खर्च एसटी महामंडळाने स्वतःच्या उत्पन्नातूनच भागवावेत, अशा कडक सूचना दिल्या आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो सामान्य प्रवासी, चाकरमानी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर खलबतं! जयंत पाटील आणि फडणवीसांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ