मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2019 (09:47 IST)

१८ जूनला राज्याचा अर्थसंकल्प

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १७ जून पासून सुरू होणार आहे. तीन आठवडे चालणा-या या अधिवेशनात कामकाजाचे केवळ १२ दिवस असणार आहेत. यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प १८ जून रोजी मांडला जाणार आहे. यानंतर २१ व २४ जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. तर राज्यपालांचे अभिभाषण चर्चा १९ व २० जून रोजी होईल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाची रूपरेखा ठरवण्यात आली आहे.
 
दुसरीकडे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ५ ते १० जून दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.