शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (15:02 IST)

महाराष्ट्रात मद्य आणणाऱ्यांवर यापुढे मकोकाअंतर्गत (MCOCA) कडक कारवाई केली जाणा

महाराष्ट्रात मद्य आणणाऱ्यांवर यापुढे मकोकाअंतर्गत (MCOCA) कडक कारवाई केली जाणार आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शभूराज देसाई यांनी यासंबंधी कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडियाच्या’ वृत्तानुसार, शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना तस्करी करणाऱ्यांविरोधात एक प्रस्ताव तयार करत पोलीस प्रशासनाला पाठवण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन पोलिसांना मकोकाअंतर्गत कारवाई करता येईल.
 
शंभूराजे देसाई यांनी कोल्हापुरात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी शेजारील कर्नाटक व गोवा राज्यातून होणारी अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी या मार्गांवर कडक तपासणी सुरु करा. यासाठी तात्पुरते चेक नाके उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविल्यास त्यास मान्यता देण्यात येईल अशी माहिती दिली होती.

Edited by : Ratnadeep Ranshoor