मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (15:15 IST)

चौथ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने

vidhan bhavan
ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत करा… पन्नास खोके, एकदम ओके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… स्थगिती सरकार हाय हाय… आले रे आले गद्दार आले… अशा घोषणा देत आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
 
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस असून महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी ईडी सरकारविरोधात आंदोलन करत सरकारला धारेवर धरण्याचे काम केले.