1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (16:28 IST)

विद्यार्थी-पालक समन्वय समितीने घेतली राज ठाकरे यांची भेट

Student Parent
विद्यार्थी-पालक समन्वय समितीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मागच्या दोन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. हाच मुद्दा घेऊन समन्वय समितीने राज ठाकरेंची भेट घेतली.
 
अकरावी प्रवेश प्रक्रियेवर मार्ग कसा काढता येईल, यावर त्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली. कारण प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली, तर कॉलेज कधी सुरु होणार? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा प्रश्न आहे. काही विद्यार्थ्यांची अ‍ॅडमिशन झाली आहेत, त्याचं काय होणार हा सुद्धा मुद्दा आहे. काही पालकांचा फी वाढीचा सुद्धा मुद्दा होता. राज्य सरकारच्या जीआर नंतरही काही शाळांनी फी वाढ केलीय, असे त्यांचे म्हणणे होते. 
 
“आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही. आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?,” असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.