शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (15:48 IST)

विद्यार्थिनीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, शाळा बंद

साताऱ्यातील उंब्रज (ता. कराड) येथील एका विद्यालयातील विद्यार्थिनीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी सांगितले. बाधित आलेल्या विद्यार्थिनीच्या संपर्कातील इतर विद्यार्थीनींचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे. दरम्यान शाळा व्यवस्थापनाने पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
येथील मुलींच्या विद्यालयातील एका विद्यार्थीनीचे शाळेतील तपासणी दरम्यान तापमान जास्त आढळून आल्याने शाळा प्रशासनाने तात्काळ त्या विद्यार्थिनीची कोरोना चाचणी करण्याची सूचना केली. त्यानंतर तिची उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिची आणि तिच्या वडिलांची, बहिणीची आरटीपीसीआर चाचणी केली. यामध्ये सदरची विद्यार्थीनी कोरोनाबधित आली असल्याचे डॉ. संजय कुंभार यांनी सांगितले.
 
या विद्यार्थीनीचे तारळे परीसरात नातेवाईक असून त्यांचा अहवालही  कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्याच संपर्कात आल्याने ती विद्यार्थीनी बाधीत झाली असावी असा अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापनाने पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले.