शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जून 2023 (20:57 IST)

नाशिकच्या अशोकाचे विद्यार्थी ठरले जिनिव्हामधील संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयात भारतीय युवा शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करणारे पाहिले युवा शिष्टमंडळ (फोटो)

अशोकाच्या विद्यार्थ्यांना जबाबदार जागतिक नागरिक होण्यासाठी सक्षम करण्याचा आमचा नेहमीच उद्देश असतो, अशोका ग्रुप ऑफ स्कूल्सच्या इयत्ता ९ वी  ते १२ वी  मधील १३ विद्यार्थ्यांनी दोन मार्गदर्शकांसह जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथील संयुक्त राष्ट्र (UN) कार्यालयाला भेट दिली आणि येथे आयोजित UN आंतरराष्ट्रीय शांतीरक्षक दिन कार्यक्रमात भाग घेतला. ३१ मे २०२३ रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. 
 
या १३ विद्यार्थ्यांनी यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (SDGs) वर सादरीकरण  केले. गरीब, श्रीमंत आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या सर्व देशांची पर्यावरणाच्या संरक्षणासह भरभराट व्हावी या उद्देशाने  २०१५ मध्ये सर्व युनायटेड नेशन्स सदस्य देशांनी SDGs ला मान्यता दिली.
 
या विद्यार्थ्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हा येथे पहिले भारतीय तरुण शांतता निर्मात्यांचे शिष्टमंडळ तयार केले जेथे त्यांनी आधुनिक जगात शांततेच्या महत्त्वावर भर दिला. संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हा कार्यालयात असे युवा शांतता निर्माते शिष्टमंडळ असलेले फ्रान्स आणि युक्रेन हे दोनच देश आहेत.
 
दरम्यान, चीन, जपान, सेनेगल, हैती, भारत, थायलंड, बांगलादेश आणि युरोपियन युनियन यांसारख्या विविध देशांतील वरिष्ठ मुत्सद्दी अधिकारी आणि संयुक्त राष्ट्रांच्या दिग्गजांसह २०० हून अधिक प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सदर भारतीय शिष्टमंडळ भेटीचे आयोजन AISP-SPIA (सोल्जर्स फॉर पीस इंटरनॅशनल असोसिएशन) यांनी केले होते.
 
अभ्यास पूर्ण सादरीकरण करताना, अशोकाच्या विद्यार्थ्यांनी UN जिनिव्हा कार्यालयात गरीबी निर्मूलन, दर्जेदार शिक्षण आणि शांतता, सुरक्षा आणि न्याय याबद्दल उहापोह केला.  विशेष म्हणजे अशोकाच्या विद्यार्थ्यांनी  फ्रेंच भाषेत दर्जेदार सादरीकरण केले व प्रेक्षकांना प्रभावित केले.
 
अशोकाच्या या युवा मनांसाठी अशा मान्यवरांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि अनेक आंतरराष्ट्रीय समस्यांवरील जागतिक दृष्टीकोन समजून घेण्याची ही एक विलक्षण संधी होती.
ही भेट म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध विकसित करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, भू-राजनीती आणि दळणवळण कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी २७ मे २०२३ ते ३ जून २०२३ या कालावधीत अशोकाच्या विद्यार्थ्यांनी  स्वित्झर्लंडमध्ये सुरू केलेल्या ७ दिवसांच्या दौऱ्याचा एक भाग होता.

या भेटीदरम्यान, अशोकाच्या विद्यार्थ्यांनी  जिनिव्हामधील रशियन मिशनच्या उपप्रमुख श्री निकिता झुकोव्ह, तसेच संयुक्त राष्ट्र आणि जिनिव्हामधील इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी असलेले राजदूत इंद्रमणि पांडे यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी विविध SDG च्या अंमलबजावणीच्या धोरणांबद्दल चर्चा केली.
 
सहभागी १३ विद्यार्थी खालील प्रमाणे:
1. प्रियाल दौलत
2. गीत पोदार
3. अर्णव कदम
4. आध्या आहेर
5. आयुष कटारिया
6. सक्षम नेमाने
7. आरव मंत्री
8. जिया दातरंगे
9. तमीम पठाण
10. तन्वी देवरे
11. युक्ती शहा
12. अब्बास रंगवाला
13. रचित बेदमुथा
 
अशोका ग्रुप ऑफ स्कूल्सचे सहाय्यक महाव्यवस्थापक डॉ. दिनेश सबनीस आणि मुख्याध्यापिका अनुत्तमा पंडित हे दोन मार्गदर्शक विद्यार्थ्यांसोबत होते.
 
अशोका ग्रुप ऑफ स्कूल्सचे माननीय अध्यक्ष अशोक कटारिया यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय प्रतिनिधी मंडळाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे सचिव श्रीकांत शुक्ला आणि व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांसह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना चांगले जागतिक नागरिक बनवणाऱ्या अशा अनोख्या उपक्रमात मनापासून सहभागी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
 
अशोकाचे विद्यार्थी UN जिनिव्हाला का गेले?
 
अशोका ग्रुप ऑफ स्कुल्स विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे आपले ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते . आमचे शालेय मिशन आम्हाला भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या खोलवर रुजलेल्या सिद्धांतासह एक जबाबदार जागतिक नागरिक बनण्यासाठी सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन करते. एक जबाबदार जागतिक नागरिक होण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंध आणि वैचारिक देवाणघेवाण करण्यास  शिकणे अत्यावश्यक आहे. हे ध्येय लक्षात घेऊन अशोकाने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे रशिया, युक्रेन, मलावी, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, कोन्गो आणि फ्रान्स यांसारख्या विविध देशांसोबत UN आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करून आंतरराष्ट्रीय संप्रेषण सक्रिय करून वर्षभर साध्य केले. विद्यार्थ्यांना हे ऑनलाईन दरवाजे उघडे करून दिल्याने , विद्यार्थ्यांमधील  हे  आंतरराष्ट्रीय   नाते अधिक सखोलपणे अनुभवता यावे आणि समजून घेता यावे यासाठी त्यांना ऑफलाइन व्यक्तीगत अनुभवाची संधी देणे देखील आवश्यक होते. यातूनच अशोकाच्या  या ७ दिवसांच्या जिनिव्हा  दौर्‍याला सुरुवात झाली .
 
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor