1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (14:05 IST)

आंदोलनात चुकीची माणसे घुसली, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही : बच्चू कडू

bachhu kadu
शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. कडू म्हणाले की, काही विद्यार्थी रस्त्यावर आले म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचे हेच मत आहे, असे नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काही चूकीचे लोकही असतील असे माझे मत आहे. याची आता चौकशी केली जाईल आणि आंदोलनातील मागण्यांवर चर्चाही करुन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन हे ठरवण्यासाठी कोणालाही सल्ला द्यायची गरज नाही. हे निर्णय शिक्षण विभाग घेईल, असंही ते म्हणाले.
 
विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिक्षणाशी काहीही संबंध नसणारी काही चुकीची माणसं घुसली आहेत. या सर्वाच्या मागे कोण आहे याचा शोध घेऊ आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची योग्य चौकशी करू, त्यांच्या शालेय जीवनावर कोणताही दुष्पपरिणाम होऊ देणार नाही. तशा सूचना पोलिसांना देऊ, असं बच्चू कडू म्हणाले.