शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (16:43 IST)

11 वर्षाचा मुलगा 3 व्हेरिएंटने संक्रमित, अल्फा, डेल्टा आणि आता ओमिक्रॉनचा संसर्ग

11 वर्षाच्या मुलाला अल्फा, डेल्टा आणि आता ओमिक्रॉनचा संसर्ग
जेरुसलेम: 11 वर्षाच्या इस्रायली मुलाला 1 वर्षात तीन वेगवेगळ्या कोविड प्रकारांची लागण झाली आहे. एलोन हेल्फगॉटला अधिकृतपणे अल्फा, डेल्टा आणि आता ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे. टाईम्स ऑफ इस्रायलने वृत्त दिले आहे की वर्षाच्या सुरुवातीपासून तो 3-4 वेळा अलग ठेवण्यात आला आहे.
 
अल्फा आणि डेल्टा प्रकारांनाही संसर्ग झाला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य इस्रायली शहरातील केफर सबाह येथील हेल्फगॉट नावाचा मुलगा गेल्या आठवड्यात ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. ओमिक्रॉन संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर मुलगा आयसोलेट आहे. हेल्फगॉटने सांगितले की त्याला यापूर्वी कोरोनाचे दोन प्रकार अल्फा आणि डेल्टा संसर्गाची लागण झालेली आहे.
 
गंभीर लक्षणे अनुभवली आहेत
इस्रायली वृत्तवाहिनी 12 न्यूजशी बोलताना हेल्फगॉट यांनी सांगितले की, तो ठीक आहे आणि पूर्णपणे निरोगी आहे. त्याने सांगितले की, तो यापूर्वी दोनदा कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. पहिल्यांदा अल्फा व्हेरिएंटने संक्रमित झाला तेव्हा त्याला गंभीर लक्षणांचा सामना करावा लागला. पण आता ओमिक्रॉन संसर्ग झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूपच कमी लक्षणं आहे. आधीच्या कोरोना संसर्गाच्या तुलनेत त्याला आता कोरोना संसर्गाची गंभीर लक्षणं नाहीत.