बुधवार, 4 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (08:23 IST)

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन जंगलात आत्महत्या !

suicide
पारनेर तालुक्यातील हंगा शहाजापुर रोडच्या जंगलात एका २० वर्षीय तरुणाने फाशी घेत आत्महत्या केली. या तरुणाचं नाव संजय सुखदेव पवार (रायतळे ता. पारनेर) असं आहे.
 
संजयने आत्महत्या करण्याआधी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. याबाबत रामदास नामदेव साळुके (रा.रायतळे ता.पारनेर) संजय पवार याने इंन्स्टाग्रांम अकाउंटवर मी फाशी घेणार आहे असा व्हिडीओ टाकला असल्याची माहिती सुपा पोलिसांना दिली.
 
सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन तात्काळ कारवाई केली. पोहेकाँ ओहळ यांनी तक्रार नोंदवून शोध घेतला असता हंगा शहाजापुर रोडवरील जंगलात संजय पवार याने फाशी घेतल्याचे निदर्शनास आले.
 
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तराय तपासणीसाठी पारनेर ग्रांमीण रुग्णालयात पाठवला. या युवकाने नैराश्यातुन आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे.