मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (21:54 IST)

कोल्हापुरातील वृद्ध जोडप्याची आत्महत्या

दीर्घ आजाराला कंटाळून कोल्हापुरातील रंकाळा तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.सोमवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
 
विजयमाला पाटील (75) आणि धोंडिराम बळवंत पाटील (80) असं आत्महत्या करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचं नाव आहे. ते मूळचे कोल्हापुरातील महाडिक वसाहतीतील रहिवासी असून सध्या जाधववाडी परिसरात वास्तव्याला होते. मृत धोंडिराम पाटील याचं मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जुन्या काळातील न्यू आनंद सायकल नावाचं दुकान होतं. पण काही दिवसांपूर्वी आर्थिक परिस्थिती बिघडल्यानंतर त्यांनी महाडिक वसाहतीतील आपलं घर विकलं आणि मुलांसह पाटोळेवाडीत राहायला आले.
 
पण वृद्धापकाळात दोघांनाही दीर्घ आजारानं ग्रासलं होतं. त्यामुळे ते आजाराला त्रासले होते. विजयमाला यांना फिट येण्याचा त्रास होता. यातूनच शनिवारी सायंकाळी दोघंही रंकाळा परिसरात तलाव फिरण्यासाठी आले होते. याच रात्री दोघांनीही एकमेकांचे हात घट्ट पकडून तलावात उडी मारून आत्महत्या केली. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.