गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:12 IST)

सरकार ओबीसीच्या शिष्यवृत्तींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे - सुनिल तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी समाजाचा विचार केला. ओबीसी समाजाचा आघाडी सरकारच्या ओबीसीच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याबाबत खास लक्ष दिले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत असताना ओबीसीची शिष्यवृत्ती वाढवली गेली. पण आज चित्र वेगळे आहे. सरकार ओबीसीच्या शिष्यवृत्तींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. दिरंगाई दाखवत आहे. धनगर समाज आज आरक्षणापासून वंचित आहे. सरकारने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते पण आश्वासनाची पूर्तता काही केली नाही. तेव्हा सरकारला आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलला पुढच्या काळात मोठ्या आक्रमकपणे काम करावे लागेल, असे आवाहन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांनी केले. आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.