Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हल्लाबोल'मुळे भाजप नैराश्यात; परिवर्तन नक्की घडणार - सुनील तटकरे

Updated: शनिवार, 7 एप्रिल 2018 (15:50 IST)
भाजपने शिवसेनेशी युती करण्यात येणार असल्याचे संकेत काल दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 'हल्लाबोल'चे हे यश आहे. राष्ट्रवादीच्या तोफेसमोर हे कमकुवत पडणार आहेत, हे भाजपला माहिती आहे. म्हणून ते आता शिवसेनेसमोर पायघड्या घालत आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपची खिल्ली उडवली.भीमकाय हत्तीला एवढीशी मुंगी हैराण करू शकते. भाजप जर हत्ती असेल तर आम्ही मुंगीची भूमिका घेऊ आणि केव्हा कानात शिरायचे, हे आम्ही ठरवू. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणुकांसाठी सज्ज आहे, असे त्यांनी नमूद केले.

अनेक जण परतीच्या मार्गावर आहेत. त्यांच्याबाबत लवकरच निर्णय घेऊ आणि पत्रकारांना त्याबाबत कल्पना देऊ. सोलापुरात पक्ष बांधणीसाठी लवकरच बैठका लावल्या जातील. 'एनडीए'ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोडचिठ्ठी दिली आहे. ते संविधान रॅलीतही सहभागी झाले होते. त्यामुळे ते येत्या काळात आमच्या समविचारी पक्षांच्या आघाडीत सहभागी होतील, असे आम्हाला वाटते, असेही ते म्हणाले. 

भाजपला ज्या लोकांनी मोठे केले, त्यांचा भाजपला विसर पडला. भाजपच्या कालच्या मेळाव्यातील बॅनरवर स्व. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नव्हता, याचे दुखः वाटते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवणी, प्रमोद महाजन यांचेही फोटो नव्हते. जे स्वतःच्या नेत्यांविषयी प्रामाणिक नाहीत, ते जनतेशी प्रामाणिक कसे राहतील? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला. 

भाजपला आता पराभव दिसू लागला आहे. विरोधी पक्षाला जनावराची उपमा देणे, हे काही योग्य नव्हते. भाजप खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. कारण भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असेही ते म्हणाले.यावेळी महिला प्रदेशाध्यक्षाचित्रा वाघ  माजी आ. व जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे हे देखील उपस्थित होते.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

काँग्रेस मुख्यालयात जोरदार वाद! 'वंदे मातरम'वरून राहुल आणि सोनिया गांधी यांच्या इशाऱ्यांवर भाजपचा हल्लबोल

पंतप्रधान मोदींची तरुणांसाठी मोठी योजना, १० दशलक्ष लोकांसाठी एआय प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते क्रीडा प्रतिभा शोध मोहिमेपर्यंत मोठ्या घोषणा

First match of the Test series भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे

LIVE: ८० व्या स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विकासाची प्रतिज्ञा घेतली

Hockey World Cup 2026 भारतीय संघ १५ ऑगस्ट रोजी हॉकी विश्वचषकातील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार

पुढील लेख
Show comments