गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भाजप निवडणुकांचा पोरखेळ करत आहे - सुप्रिया सुळे

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा केला जात आहे. भाजपच्या या दाव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपतर्फे निवडणूकांचा पोरखेळ सुरू आहे असा टोला खासदार सुळे यांनी लगावला. औरंगाबाद येथे जागर युवा संवाद यात्रेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
 
हे सरकार काम कमी आणि निवडणुका जिंकायच्या कशा याकडे जास्त लक्ष देत आहे. सरकारला सर्वसामान्य माणसांची कामे, प्रश्न याबाबत काही एक देणे घेणे नाही अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधान कार्यालयही हेच काम करत आहे याचे दुखः होते असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
 
आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, मराठा, धनगर, मुस्लिम या समाजांना तात्काळ आरक्षण मिळावे ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. असंख्य विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही पण जे शिक्षण घेऊ इच्छितात अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी सरकारने पुढाकार घेऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.