गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पेट्रोल-डिझेलचा 11 रूपयांचा सेस काढून टाका

मुंबई- दुष्काळ आणि दारूचा मिळून 11 रूपये असलेला अतिरिक्त कर राज्य सरकाराने त्वरित बंद करून जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
 
राष्ट्रवादी भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मलिक बोलत होते. दुष्काळच्या पार्श्वभूमीवर राज्यात सप्टेंबर 2015 साली प्रतिलिटर 9 रूपये एवढा दुष्काळ सेस लावला होता. तरीही मागच्या दोन वर्षात सरकारने दुष्काळ जाहीर केला नाही. आज महाराष्ट्र दुष्काळ मुक्त झाला आहे. तसेच 1 एप्रिलपासून महामार्गालगत असलेली दारूची दुकाने न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आली होती. त्याचा महसूल बुडत असल्यामुळे पुन्हा प्रतिलिटर 2 रूपये कर लावण्यात आला.
 
दारू न पिणार्‍या लोकांनाही या कराचा भुर्दंड पडत होता. आता न्यायालयानेही ही बंदी उठवली आहे, असे मलिक म्हणाले.