बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (12:09 IST)

व्हायरल डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळे यांचे सडेतोड उत्तर

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कन्येचे पूर्वशीचे लग्न ठाण्याचे जिल्हाधिकारी  राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हारशी झाले. लग्नसोहळा दणक्यात पार पडला. या लग्नसोहळ्यात मोठ्या मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली .या लग्नसोहळ्यात संगीताचा कार्यक्रम झाला या मध्ये संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केलेला डान्स व्हायरल झाला. या डान्सला बघून काही लोकांनी टीका केली. या वर सुप्रिया सुळे यांनी टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या ,हा एक कौटुंबिक कार्यक्रम असून आमच्या घरच्या मुलीचे लग्न होते. या खासगी समारंभात आम्ही काय करतो या वर कोणी टीका करत असेल तर त्याला काय म्हणायचे. तो आमचा घरगुती समारंभ होता. आमच्या खासगी घरातील कार्यक्रमात घरचेच लोक होते. टीका करणाऱ्यांनी तरीही टीका करायची असेल तर आम्ही काय बोलणार?