सोमवार, 17 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (08:19 IST)

नाशिकमध्ये शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला १० डिसेंबरपर्यंत स्थगिती

राज्यात १ डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचा शाळा सुरू होणार आहे. या पार्श्व भूमी वर शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी नियमावाली देखील जाहीर केली आहे. मात्र, नाशिकमध्ये सध्या पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, असा निर्णय झालेला आहे. नाशिकचे महापालिका आयुक्त विलास जाधव यांनी याबाबत माहिती दिली आहे.पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याबाबतचा निर्णय देखील १० डिसेंबरपर्यंत स्थगित ठेवण्यात आलेला आहे असे यावेळी सांगण्यात आले आहे.