मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (09:29 IST)

ममता बॅनर्जी आजपासून मुंबई दौऱ्यावर; शरद पवार, उद्धव ठाकरेंची घेणार भेट

पश्चिम बंगालच्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज संध्याकाळी मुंबईत दाखल होत आहेत. त्या दोन दिवस मुंबईत असतील.
या मुंबई दौऱ्यादरम्यान त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतील
पुढच्या महिन्यात बंगालमध्ये होऊ घातलेल्या जागतिक व्यापारी परिषदेच्या निमित्ताने त्या 1 डिसेंबरला उद्योग जगातील व्यक्तींना भेटणार असल्याचं म्हटलंय.
ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झाल्यानंतर सिद्धीविनायकाचं दर्शन घेतील आणि नंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नानंतरच्या स्वागत सोहळ्यालाही त्या उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बुधवारी 1 डिसेंबर रोजी मुंबईतल्या उद्योगपतींना त्या भेटतील आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन बंगालला परततील.