शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आता थेट लाहोरवर तिरंगा फडकवा: शिवसेना

surgical strike
पाकिस्तानेचे बंकर उद्धवस्त केल्यानंतर या मिनी सर्जिकल स्ट्राइकचे सर्वत्र कौतुक होत असून भाजपाच मित्रपक्ष शिवसेनेही या कारवाईचे स्वागत केले आहे.
 
देर आए लेकीन दुरुस्त आए अशी प्रतिक्रिया या कारवाईनंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली. शिवसेना या कारवाईचे स्वागत करत आहे. मात्र, आता इतक्यावरच थांबून चालणार नाही. थेट लाहोरपर्यंत जाऊन तिरंगा फडकावयला हवा, असे आवाहनही सावंत यांनी केले.
 
शिवसेना प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी मात्र या कारवाईला चोख प्रत्युत्तर म्हणता येणार नाही, असा सूर लावला. काँग्रेस नेते रणदीप सूरजेवाला यांनीही लष्कराने केलेल्या कारवाईचे मुक्तकंठाने स्वागत केले.