1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (08:15 IST)

अहो आश्चर्यम् , त्रंबकेश्वर परिसरात युरेशियन हॅाबीचे दर्शन; सर्वाधिक वेगवान, स्थलांतरीत शिकारी पक्षी

Surprisingly
पक्षीप्रेमी रविंद्र धारणे यांना त्यांच्या परसबागेमध्ये युरेशियन हॅाबी पक्षाचे दर्शन घडले आहे. त्यांनी या पक्षाला आपल्या कॅमेर्‍यात बंद केले आहे. हा स्थलांतरीत पक्षी असल्याने आपल्याकडे त्याचे दर्शन दुर्मिळ समजले जाते.
युरेशियन हॅाबी हा पक्षी फालको सूब्बोटेओ या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. त्याची लांबी साधारणत: ३० ते ३६ से.मि. असून तो अंगकाठी सडपातळ असतो. त्याचे पंख त्याच्या आकारापेक्षा मोठे, टोकदार लांब असतात. बाकदार तिक्ष्ण चोच, धारदार नखे आणि विलक्षण शक्तीमान तिक्ष्ण नजर हे याचे गुणवैशिष्ठय आहे.
ससाणा गटातील हा एक शिकारी पक्षी असून लहान पक्षांची हा शिकार करतो. हवेतल्या हवेत भक्ष पकडण्यासाठी आणी ते उडतांनाच खाण्यासाठी तो प्रसिध्द आहे.
त्र्यंबकेश्वर निवांत परिसर असल्याने दरवर्षी विविध स्थलांतरीत पक्षी येथे हजेरी लावतात.
सायबेरीन वॅकटेल, इस्त्रायलचा राष्र्टीय पक्षी हुपु अशा विविध पक्षांनी त्यांच्या अंगणात हजेरी लावली आहे. हे स्थलांतरीत पक्षी एक दोन दिवस थांबून पुढील मार्गक्रमण करतात.