गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 मे 2021 (16:02 IST)

काळ्याबाजारात रेमडेसिवीर मिळत असल्याने आश्चर्य एका इंजेक्शनसाठी 27000 एवढा दर

अनेक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मात्र उपचार करताना  कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, काळ्याबाजारात रेमडेसिवीर मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याआधी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याचे पुढे आले होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कारावाईचे संकेत दिले होते. त्यानंतरही  रेमडेसिवीरमध्ये काळाबाजार होत असल्याचे पुढे आले आहे. नाशिक पोलिसांनी जादा दराने विक्री करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले आहे.
 
नाशिकच्या के के वाघ कॉलेज जवळ रेमडेसीवीरची जादा दराने विक्री करणाऱ्या चौघांना आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  चार संशयित आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या तीन महिला खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. पुन्हा एकदा रेमडेसिवीर काळाबाजार होत असल्याने नाशिक पोलिसांनी कार्यवाहीचा बडगा उचलला आहे.
 
 रेमडेसीवीर औषधाच काळाबाजार करणाऱ्यांवर FDA सोबत आडगाव पोलीस ठाण्याचे इरफान शेख यांनी कारवाई केली. तिन्ही महिला मुंबई नाका इथल्या फॉरचुन हॉस्पिटलमध्येमध्ये परिचारीका म्हणून कार्यरत असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. बनावट ग्राहक बनून पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे. चौथा आरोपी अ‍ॅपेक्स हॉस्पिटल इथे मेडिकल बॉय म्हणून काम करत आहे.
 
 रेमडेसीवीरच्या एका इंजेक्शनसाठी 27000 एवढा दर लावण्यात आला होता. तसेच आरोपीकडून दोन इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली आहेत.  पूर्वी देखील एक डॉक्टर जादा भावाने रेमडीसीवर इंजेक्शन  विकत होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी जागृती शार्दुल, श्रुती उबाळे, स्नेहल पगारे, कामेश बच्छाव यांचा समावेश आहे.