शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापूर , मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (10:40 IST)

सुशीलकुमार शिंदे यांना विद्यापीठाची डी.लिट.

sushilkumar shinde
सोलापूर विद्यापीठातर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना 'डॉक्टर ऑफ लिटरेचर' (डी.लिट.) ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये होणार्‍या विद्यापीठाच्या बाराव्या दीक्षांत समारंभात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरु डॉ. एन. एन. मालदार यांनी दिली.  
 
सुशीलकुमार शिंदे हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे आणि आंध्र प्रदेशातील सर्व सार्वजनिक विद्यापीठाचे कुलपती होते. त्यांना आतापर्यंत चार विद्यापीठाने डी.लिट. या मानद पदवीने सन्मानित केले आहे. त्यानंतर सध्या सोलापूर विद्यापीठातर्फे डी.लिट. ही मानद पदवी देऊन गौरविण्यात येणार आहे.