मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (17:15 IST)

सुषमा अंधारेंचे विभक्तपती वैजनाथ वाघमारे यांचा शिंदे गटात प्रवेश

sushma andhare
ठाकरे गटाची तोफ म्हणवल्या जाणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता ते सुषमा अंधारे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे.टेंभी नाकाच्या आनंद मठ येथे हा पक्ष प्रवेशाचा सोहळा झाला. वाघमारे आणि सुषमा अंधारे यांच्यात घटस्फोट झाला असून ते सहा वर्षांपासून विभक्त राहतात. वाघमारे यांनी एका वृत्तवाहनीला सांगितले की सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णया वरून आमच्यात मतभेद झाले. आम्ही घटस्फोट घेऊन आता विभक्त राहतो. आमचा  एकमेकांशी  काहीही संबंध नाही. 

मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे हे सर्वसामान्य असून त्यांना सर्व सामान्य आणि घोर गरिबांविषयी कळकळ आहे. ते सर्व सामान्य माणसाचे दुःख समजून त्यांच्यासाठी काम करणारे आहे. त्यांना हातभार देण्यासाठी मी त्यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन राजकीय घडामोडींवर काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. विभक्त पतींच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश वर त्या म्हणाल्या मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. आम्ही गेल्या 5 -6 वर्षांपासून विभक्त आहोत. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार आहे. यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. प्रत्येकाचं खासगी आयुष्य आहे. आपापले निर्णय घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. 
   
 
Edited By - Priya Dixit