शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जून 2020 (09:04 IST)

नागपूर: दारूऐवजी सॅनिटायझर पिल्याने एकाचा मृत्यू

नागपूर- येथे महापालिकेच्या एका सफाई कर्मचार्‍याने दारुऐवजी सॅनिटायझर ‍पिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. त्याला दररोज मद्य प्राशन करण्याची सवय होती आणि एक दिवस दारू न मिळाल्याने त्याने घरातील सॅनिटायझर प्राशन केले. नंतर प्रकृती खराब होऊन त्याचा मृत्यू झाला. 
 
45 वर्षीय गौतम बिसेन गोस्वामी रा. गुजरनगर, गंगाबाई घाट असे मृताचे नाव आहे. गौतम महापालिकेत रोजंदारीवर सफाई कामगार होते. टाळेबंदीमुळे त्यांना दारु मिळत नव्हती अशात त्या काळात त्यांनी नियमित सॅनिटायझरचे प्राशन केले. 21 जून रोजी त्यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यात आला परंतू अखेर त्यांचा मृत्यू झाला.